Achraf Hakimi Controversy : “तो माझ्या पोटातील बाळाचा बाप…”, स्टार खेळाडूवर मॉडेलचे गंभीर आरोप; इन्स्टावरील VIDEO लगेच डिलीट केल्याने खळबळ
Achraf Hakimi Controversy : माजी डब्ल्यूएनबीए खेळाडू कायसरे गोंड्रेझिकने अश्रफ हकिमी हा तिच्या मुलाचा बाप असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Achraf Hakimi Kysre Gondrezick Pregnancy Allegations Viral Instagram Story : सोशल मीडियावर पोस्ट करून अवघ्या काही मिनिटांत डिलीट करण्यात आलेल्या एका इन्स्टा स्टोरीने क्रीडाविश्वात मोठी खळबळ निर्माण केली आहे. माजी डब्लूएनबीए (WNBA) खेळाडू आणि लोकप्रिय मॉडेल कायसरे गोंडरेझिकने (Kysre Gondrezick) आपण गरोदर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या बाळाचे वडील पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि मोरोक्को फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू अशरफ हकीमी (Achraf Hakimi) असल्याचे जाहीर केले आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून, या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
“माझ्यावर फसवणूक झाली”; गोंडरेझिकने मांडली आपली व्यथा!
सोशल मीडियावरून अनेक दिवस गायब असण्याचे कारण स्पष्ट करताना गोंडरेझिक भावुक झाली होती. तिने सांगितले की, ती आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात होती. जुलैमध्ये तिला आपल्या गर्भधारणेबद्दल समजले. “मला इतरांचे रक्षण करण्याऐवजी आता माझे सत्य जगासमोर मांडायचे आहे; माझी फसवणूक झाली असून मला केवळ वापरल्याची तीव्र भावना मनात आहे,” असा थेट आरोप तिने केला.
ह्युस्टन दौऱ्यादरम्यानची भेट; हकीमीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण नाही!
1.Kysre posted a video claiming she was pregnant with footballer Achraf Hakimi’s baby
2.They allegedly met at her house back inJune/July
3.Yesterday, she allegedly tagged Hakimi in the video she posted
4.She was allegedly watching theFrance vs. Morocco quarter-final on her phone https://t.co/8TO2PXXX3c— Royal White Gossip (@RoyalWhitegossi) October 9, 2026
गोंडरेझिकच्या दाव्यानुसार, फिफा विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोरोक्को संघ ह्युस्टनमध्ये असताना ही भेट झाली होती. ४ जुलै २०२६ रोजी ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर मोरोक्कोने कॅनडाविरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये हकीमी मैदानात उतरला होता. मात्र, मैदानाबाहेरील त्यांच्या भेटीचा कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. दुसरीकडे, या व्हायरल व्हिडिओवर हकीमी, त्याची कायदेशीर टीम, पीएसजी किंवा मोरोक्को फुटबॉल फेडरेशनने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही युजर्स हा व्हिडिओ एआय (AI) किंवा डीपफेक असल्याचा संशयही व्यक्त करत आहेत.
एनबीए स्टार जेलन ब्राऊनसोबतच्या नात्याचीही झाली होती चर्चा!
कायसरे गोंडरेझिक यापूर्वी एनबीए चॅम्पियन जेलन ब्राऊनसोबतच्या संबंधांमुळे प्रचंड चर्चेत आली होती. २०२४ च्या चॅम्पियनशिप परेड आणि पुरस्कार सोहळ्यात ते एकत्र दिसले होते; मात्र २०२४ च्या अखेरीस त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने आपण सिंगल असल्याचे जाहीर केले होते. आता थेट हकीमीवर केलेल्या या खळबळजनक आरोपांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.





