Abhishek Sharma Rankings : अभिषेक शर्मा बनला जगातील नंबर १ फलंदाज; इशान टाकले मागे, मार्को यान्सेनने जडेजाचे संपवले ४ वर्षांचे वर्चस्व
Abhishek Sharma Rankings : अभिषेक शर्मा जगातील नंबर १ फलंदाज बनला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनने कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा आणि मिचेल स्टार्क यांना मागे टाकून इतिहास रचला आहे.

Abhishek Sharma Becomes World Number 1 T20I Batter in ICC Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या टी-२० क्रमवारीत ऐतिहासिक झेप घेत जागतिक अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ३५ चेंडूंत वादळी शतक ठोकणाऱ्या अभिषेकने जगातील नंबर-१ टी-२० फलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. त्याने भारताचाच सहकारी इशान किशनला मागे टाकले असून, दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकल्याने इशान किशन थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
टॉप-१० मध्ये भारताचे चार फलंदाज; इशान किशनला फटका –
ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारताचे चार फलंदाज अव्वल दहाच्या यादीत आपले स्थान टिकवून आहेत. मात्र, गेल्या आठवड्यापर्यंत अग्रस्थानी असलेला इशान किशन दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धचे सामने खेळू शकला नाही. त्याचा थेट फायदा पाकिस्तानच्या साहिबझादा फरहानला झाला असून तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर इशानची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा राशीद खान गोलंदाजीत आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत अजूनही नंबर-१ वर कायम आहेत.
गोलंदाजीच्या टॉप-१० मधून भारतीय खेळाडू गायब –
भारतीय गोलंदाजांसाठी ही क्रमवारी निराशाजनक ठरली आहे. अष्टपैलू अक्षर पटेल एका स्थानाने घसरून ११ व्या क्रमांकावर फेकल्यामुळे अव्वल १० मध्ये आता एकही भारतीय गोलंदाज उरलेला नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग १५ व्या, तर विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह २७ व्या स्थानावर आहे. ऑलराउंडर्सच्या यादीत दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या १८४ रेटिंग गुणांसह १३ व्या स्थानी असून तोच अव्वल भारतीय अष्टपैलू आहे.
𝗧𝗵𝗲 𝗡𝗲𝘄 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗡𝗼.𝟭 🫡
Congratulations to Abhishek Sharma on reclaiming the top spot in the ICC Men’s T20I Batting Rankings 👏👏
#TeamIndia | @OfficialAbhi04 https://t.co/tjtDSTAEp0
— BCCI (@BCCI) October 28, 2026
मार्को यान्सेनचा दुहेरी धमाका; मिचेल स्टार्कला पछाडले –
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन याने कसोटी क्रिकेटमध्ये अभूतपूर्व इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ८५ धावा आणि ५ विकेट्स घेण्याच्या अद्भूत कामगिरीच्या जोरावर यान्सेन एकाच वेळी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जगातील नंबर-१ खेळाडू बनला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ५ स्थानांची मोठी झेप घेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
रवींद्र जडेजाचे चार वर्षांचे वर्चस्व अखेर संपुष्टात –
𝐀 𝐭𝐫𝐢𝐩𝐥𝐞 𝐭𝐚𝐤𝐞𝐨𝐯𝐞𝐫 👑
Abhishek Sharma and Marco Jansen take top honours across three categories in the ICC Men’s Player Rankings 👏
Read more ➡️ https://t.co/nwWCLiixZn https://t.co/ozqVKqXmXY
— ICC (@ICC) October 29, 2026
यान्सेनने केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीतही भारताचा दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजाचे तब्बल चार वर्षांहून अधिक काळ चाललेले साम्राज्य संपुष्टात आणले आहे. जडेजाला सिंहासनवरून खाली खेचत यान्सेन आता जगातील नंबर-१ कसोटी ऑलराउंडर बनला आहे. एकाच वेळी गोलंदाजी आणि अष्टपैलू अशा दोन्ही विभागांत अव्वल स्थान गाठणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.





