AB De Villiers : डिव्हिलियर्सने निवडली ऑलटाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन; सचिन-रोहितला नव्हे तर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना दिलं स्थान

सध्या एबी डिव्हिलियर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचे नेतृत्व करत आहे. एका सामन्यानंतरच्या व्हिडिओ संभाषणात त्याने आपली ऑलटाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. सलामीवीर म्हणून त्याने दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन यांची निवड केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंगला स्थान दिले.
AB de Villiers’ all-time World XI: 🤔 pic.twitter.com/sb6GJrDwSd
— Anand (@axnxnd22) July 25, 2025
फक्त दोन वेगवान गोलंदाजांना दिले स्थान –
त्यानंतर चौथ्या क्रमांकाची जबाबदारी त्याने भारतीय फलंदाज विराट कोहलीवर सोपवली आहे. याशिवाय, डिव्हिलियर्सने आपल्या संघात ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांनाही स्थान दिले आहे. मात्र, त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांसारख्या भारतीय दिग्गज फलंदाजांना आणि वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा याला आपल्या संघात स्थान दिलेले नाही.एबी डिविलियर्सने आपल्या या संघात फक्त दोन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे.
हेही वाचा – Ayush Mhatre : आयुष म्हात्रेचा इंग्लंडमध्ये मोठा धमाका! वैभव सूर्यवंशीला मागे टाकत केला विश्वविक्रम
यष्टिरक्षक निवडीबाबत डिव्हिलियर्स थोडा संभ्रमात –
यष्टिरक्षक निवडीबाबत डिव्हिलियर्स थोडा संभ्रमात दिसला. त्याने एमएस धोनी, अॅडम गिलक्रिस्ट आणि मार्क बाउचर यापैकी एकाची निवड करण्याबाबत बोलला. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने मिचेल जॉनसन आणि मोहम्मद आसिफ यांना पसंती दिली. विशेष म्हणजे, मोहम्मद आसिफवर २०१० मध्ये सामन्यापूर्वी निश्चिती (मॅच फिक्सिंग) प्रकरणी बंदी घालण्यात आली होती. फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत, डिविलियर्सने मुथय्या मुरलीधरन आणि महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांना आपल्या संघात स्थान दिले.
हेही वाचा – IND vs ENG : मँचेस्टर कसोटीतून वगळल्याने करुण नायर भावुक; केएल राहुलने दिला धीर, PHOTO व्हायरल
एबी डिव्हिलियर्सची ऑलटाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन –
ग्रीम स्मिथ, मॅथ्यू हेडन, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन, धोनी/गिलक्रिस्ट/बाउचर, मिचेल जॉनसन, मोहम्मद आसिफ, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न.





