MLC 2025 : किरॉन पोलार्डचा टी-२० मध्ये मोठा धमाका, किंग कोहलीला ‘या’ बाबतीत टाकलं मागं

MLC 2025 Kieron Pollard overtakes Virat Kohli in T20 runs : अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने एक मोठा विक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे.
किरॉन पोलार्ड एमएलसी २०२५ मध्ये एमआय न्यू यॉर्ककडून खेळत आहे. या हंगामात त्याच्या संघाचा पहिला सामना टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध होता. या सामन्यात पोलार्डने १६ चेंडूत ३२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले. पोलार्डने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ६९६ सामन्यांमध्ये १३५६९ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, विराटने टी-२० क्रिकेटमध्ये १३५४३ धावा केल्या आहेत.
टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर?
Still got it 💪💥
#OneFamily #MINewYork #MLC #MINYvTSK | Kieron Pollard pic.twitter.com/MzL0TaTjbn— MI New York (@MINYCricket) June 14, 2025
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यांमध्ये १४५६२ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलेक्स हेल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने १३७०४ धावा केल्या आहेत. शोएब मलिकचे नाव १३५७१ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्ड आणि विराट कोहली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचा – Temba Bavuma : ‘अनेकांना आमच्यावर शंका होती पण…’, विजेतेपदानंतर टेम्बा बावुमाने टीकाकारांची बोलती केली बंद
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- ख्रिस गेल – १४५६२ धावा (४६३ सामने)
- अॅलेक्स हेल्स – १३७०४ धावा (४९७ सामने)
- शोएब मलिक – १३५७१ धावा (५५७ सामने
- किरॉन पोलार्ड – १३५६९ धावा (६९६ सामने)
- विराट कोहली – १३५४३ धावा (४१४ सामने)
किरॉन पोलार्ड जगभरातील बहुतेक टी-२० लीगमध्ये खेळताना दिसतो. दुसरीकडे, विराटने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त टी-२० फॉरमॅटच्या नावाखाली आयपीएलमध्ये खेळतो. जर पोलार्डने पुढच्या सामन्यात फक्त तीन धावा केल्या तर तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शोएब मलिकला मागे टाकेल.





