Hardik Pandya : हार्दिक पंड्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात केला मोठा पराक्रम! पूर्ण केलं खास ‘त्रिशतक’

PBKS vs MI Hardik Pandya celebrated his 300th T20 match : आयपीएल २०२५ च्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १८४ धावा केल्या. सूर्या व्यतिरिक्त, हार्दिक पंड्या, रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनीही लहान पण महत्त्वाच्या खेळी खेळल्या. दरम्यान या सामन्यात हार्दिक पंड्याने एक खास पराक्रम केला.
हार्दिकने टी-२० क्रिकेटमधील ३०० सामन्याचा टप्पा केला पार –
या सामन्यात खेळायला उतरताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने खास त्रिशतक पूर्ण केले. हा त्याचा टी-२० क्रिकेटमधील ३०० वा सामना आहे. हार्दिक त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या ३०० व्या टी-२० सामन्यात त्याने १५ चेंडूत २६ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
🚨 𝑴𝑰𝑳𝑬𝑺𝑻𝑶𝑵𝑬 🚨
Hardik Pandya features in his 150th IPL match and marks his 300th T20 appearance! 🇮🇳💙🤝
What a journey! 👏#IPL2025 #India #HardikPandya #Sportskeeda pic.twitter.com/OHQ9riVLGF
— Sportskeeda (@Sportskeeda) May 26, 2025
टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिकच्या नावावर ५००० पेक्षा जास्त धावा –
हार्दिक पंड्याने आतापर्यंत ३०० टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये ५५३८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून २१ अर्धशतके आली आहेत. तो १० वेळा शून्यावर बाद झाला आहे. जर तो त्याच्या लयीत असेल तर तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला उध्वस्त करू शकतो.
हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! मोडला सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम
हार्दिक पंड्याचा आयपीएलमधील १५० वा सामना –
Hardik Pandya blazes his way to 150 IPL matches! 🔝
P.S. : It is also his 300 T20 game! WHAT. A. CAREER he’s had so far! 💪 #IPL2025 #PBKSvsMI #HardikPandya pic.twitter.com/MrBmECpEy6
— OneCricket (@OneCricketApp) May 26, 2025
याशिवाय, हा त्याचा आयपीएलमधील १५० वा सामना आहे. त्याने १५० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण २७१२ धावा केल्या आहेत, ज्यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने ७७ विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वाखील गुजरातला आयपीएल २०२२ चे जेतेपद पटकावून दिले आहे.





