पुणे जिल्हा | बेलसर-निळुंज सोसायटीला कायमस्वरूपी ढाल

बेलसर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील बेलसर-निळुंज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे जिल्हा बँकेच्या वतीने कायमस्वरूपी ढाल देऊन गौरव करण्यात आला.
बेलसर निळुंज सोसायटीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये स्वनिधी उभारणी, स्वमालकीची इमारत बांधणे, सभासदांना उत्तम सेवा अशा विविध कामांबद्दल हा गौरव मिळाला आहे.
पुण्यातील अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, संचालक रमेश थोरात, दिलीप मोहिते पाटील,
जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदींच्या हस्ते बेलसर निळुंज सोसायटीच्या संचालक मंडळांचा सन्मान करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष व्यंकट गरुड, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव हनीफ सय्यद व संचालकांनी सन्मानाची ढाल स्वीकारली.
सोसायटीने खते, बी बियाणे, औषधे व शेतीपूरक वस्तू विक्रीचा व्यवसाय परवाना काढला आहे. सोसायटीचे भाग भांडवल 65 लाख 97 हजार असून, इमारत निधी 26 लाख राखीव निधी 33 लाख इतर निधी सहा लाख बँकेचे भाग 36 लाख मुदत ठेव 28 लाख ना परतीची ठेव 26 लाख अशा आश्वासक तरतुदी आहेत.
तसेच बँक कर्ज 4 कोटी उचलले असून सोनिधीमुळे सभासद कर्जवाटप पाच कोटी 34 लाख इतके आहे. अशी माहिती गरुड व सय्यद यांनी दिली आहे.





