Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट? उद्या पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; आज फडणवीस-नार्वेकर-जयंत पाटील एकाच विमानात
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमान प्रवास केला.

Maharashtra Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असतानाच आज कोल्हापूरमध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित विमान प्रवास केला. या भेटीगाठींमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जात आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Politics)
फडणवीस-नार्वेकर-जयंत पाटील एकाच विमानात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर होते. तर जयंत पाटील हे आपल्या इस्लामपूर मतदारसंघातील कार्यक्रमांसाठी जाणार होते. याचदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित विमान प्रवास केला. (Maharashtra Politics)
या प्रवासामागे नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, उद्या पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार असतानाच ही घडामोड घडल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
उद्या पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीला
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 लोकसभा खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही भेट महाराष्ट्रातील विविध विकासकामांसह महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics)
मात्र, सध्या चर्चेत असलेल्या डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, डिलिमिटेशन विधेयकाविरोधात आमचे खासदार मतदान करतील, मतदानाच्या वेळी कोण कुणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट होईल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)
काँग्रेस आणि ठाकरे गटाची नजर
या भेटीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी-शाह यांच्या भेटीगाठींवरून काहीतरी शिजत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, पवारांचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग असून कोणीही कुठेही जाणार नाही, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Politics)
जयंत पाटील-विनोद तावडे भेटीपासून चर्चांना सुरुवात
काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनौपचारिक भेट झाली होती. 3 जुलै रोजी झालेल्या या भेटीनंतर शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र, जयंत पाटील यांनी ही भेट एका कामानिमित्त झाल्याचे स्पष्ट केले होते. सुप्रिया सुळे यांनीही त्याच स्वरूपाचे स्पष्टीकरण दिले होते. (Maharashtra Politics)
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीनेही वाढली होती चर्चा
यानंतर 7 जुलै रोजी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनातील शिंदे यांच्या दालनात भेट झाली. या भेटीत शरद पवारांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भातील बैठकीच्या निमित्ताने ही भेट झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. (Maharashtra Politics)
मोदी-पवार भेटीनंतर आता 8 खासदारांची भेट
दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली होती. त्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार थेट पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. (Maharashtra Politics)
एकीकडे पवार गटाचे खासदार मोदींच्या भेटीला जाणार, तर दुसरीकडे फडणवीस-नार्वेकर-जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास झाला आहे. त्यामुळे या सर्व भेटीगाठी केवळ योगायोग आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे, याची चर्चा आता रंगली आहे. (Maharashtra Politics)
मात्र, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत घरोबा करणार का? की या केवळ राजकीय आणि प्रशासकीय भेटी आहेत? याचे उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)






