Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप? शरद पवारांचे ८ खासदार मोदींची भेट घेणार; महत्वाचं कारण समोर…
Maharashtra Politics :

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लोकसभा खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील विविध प्रश्न आणि विकासकामांबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ११ वाजता पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. पंतप्रधान सर्व पक्षांच्या खासदारांना भेटत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विकासकामे आणि राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही अधिकृत भेट असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
FCRA विधेयकाला विरोध; JPCकडे पाठवण्याची मागणी
दरम्यान, प्रस्तावित FCRA विधेयकावरून शरद पवार गटाने सरकारला इशारा दिला आहे. सध्याच्या स्वरूपात हे विधेयक मंजूर करण्यास पक्षाचा विरोध असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सरकारने घाई न करता विधेयकावर सविस्तर चर्चा करावी. विधेयक मागे घ्यावे किंवा ते संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Maharashtra Politics)
परदेशातून मिळणारा प्रत्येक निधी चुकीचा नसतो. अनेक संस्था आणि संघटनांकडून समाजोपयोगी कामांसाठीही परदेशी निधीचा वापर केला जातो. त्यामुळे या विषयावर अविश्वासाऐवजी पारदर्शकता आणि सविस्तर चर्चेची गरज असल्याचे सुळे यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नियम आणि अटी लावल्या जातात, मात्र इतर प्रकरणांमध्ये नियम कुठे जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
FCRA म्हणजे काय?
FCRA म्हणजे Foreign Contribution Regulation Act. परदेशातून मिळणाऱ्या देणग्या, निधी किंवा आर्थिक योगदानाचे नियमन या कायद्यांतर्गत केले जाते. NGO, ट्रस्ट, संस्था आणि संघटनांना परदेशी निधी स्वीकारण्यासाठी FCRA अंतर्गत नोंदणी किंवा परवानगी आवश्यक असते. या निधीचा वापर कुठे आणि कशासाठी केला जातो, यावर सरकारकडून नियम आणि देखरेख ठेवली जाते. (Maharashtra Politics)
Supriya Sule : विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी; सुप्रिया सुळेंनी केली मागणी






