‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत

Oh My God 3 Film | अभिनेता अक्षय कुमारच्या ‘ओएमजी‘ या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या नव्या भागात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या दोन भागांमध्ये देवाच्या भूमिकेत दिसलेला अक्षय कुमार यावेळी मुख्य भूमिकेत नसून तो केमिओ करणार आहे.
अक्षय कुमार या सिनेमात केवळ एका छोट्या पाहुण्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मात्र निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
‘ओएमजी ३’ मध्ये राणी मुखर्जी एका देवीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीच्या भागांमध्ये अक्षय कुमारने भगवान कृष्ण आणि भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारली होती. मात्र, तिसऱ्या भागात निर्मात्यांनी स्त्री देवतेच्या दृष्टिकोनातून कथा मांडण्याचे ठरवले आहे. Oh My God 3 Film |
#Exclusive ✅#AkshayKumar & #RaniMukerji
Starrer #OhMyGod3 to be titled #OhMyGoddess & will have a divine feminine twist 🔔Sources tell us that the upcoming part is tentatively titled #OhMyGoddess with the divine female character surrounding.#OMG3 #OMG pic.twitter.com/lzgIOkGTLD
— Always Bollywood (@AlwaysBollywood) January 4, 2026
राणी मुखर्जीचा या चित्रपटातील लूक आणि भूमिका अत्यंत वेगळी आणि प्रभावी असणार आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा राणी मुखर्जीच्या पात्राभोवती फिरणार असून, अक्षयचे पात्र केवळ कथेला वळण देण्यासाठी वापरले जाणार आहे.
शूटिंगला लवकरच सुरुवात
‘ओएमजी ३’चे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत, ज्यांनी ‘ओएमजी २’चे देखील यशस्वी दिग्दर्शन केले होते. यावेळचा विषय देखील सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून, २०२६ च्या अखेरीस तो प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ओह माय गॉड’ हा चित्रपट २८ सप्टेंबर २०१२ रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तर, ११ ऑगस्ट २०२३ मध्ये OMG २ चित्रपट रिलीज झाला होता.
हेही वाचा:
लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये





