Arun Govil | Lok Sabha Election 2024 : आजही आपण टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट मालिकेबद्दल बोललो तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चे नाव अग्रस्थानी येईल. 1987 मध्ये सुरू झालेले रामानंद सागर यांचे रामायण लोकांना इतके आवडले की, लॉकडाऊनच्या काळात ‘रामायण’ पुन्हा प्रसारित झाले होते, तेव्हा पुन्हा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला. Arun Govil | Lok Sabha Election 2024
लोक या शोवर विश्वासू होते आणि त्यातील पात्रांना वास्तविक देव मानले जाऊ लागले. उत्कृष्ट कास्टिंग हे त्यामागचे खरं कारण होते. त्यावेळी लोकांनी श्रीरामाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते ‘अरुण गोविल’ यांना खरेच प्रभू श्रीराम मानले होते. आता अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठ या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपकडून त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
नुकतंच भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात अभिनेते अरुण गोविल यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अरुण गोविल देखील भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं.
अरुण गोविल यांची संपत्ती किती? Arun Govil | Lok Sabha Election 2024
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गोविल यांना ‘रामायण’च्या प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 51 हजार रुपये मानधन मिळत होते. रामायणाचे एकूण 81 एपिसोड होते. त्यानुसार, गोविल यांना 40 लाखापेक्षा अधिक मानधन मिळाले.
त्यानंतर त्यांनी ‘ओह माय गॉड 2’साठी 50 लाख रुपयांचे मानधन घेतले. अरुण गोविल यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये त्यांनी सुमारे 60 लाख रुपयांची आलिशान कारही खरेदी केली आहे. याशिवाय त्यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे.
अरुण गोविल यांचे शिक्षण किती? Arun Govil | Lok Sabha Election 2024
अरुण गोविल यांचे सुरुवातीचे शिक्षण मेरठमधून झाले. त्यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण केले. यानंतर अरुण यांनी नाट्य आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1975 मध्ये अरुण गोविल मुंबईत आले आणि भावासोबत राहू लागले.
यानंतर त्यांना विक्रम-वेताळच्या कथेवर आधारित असलेली मालिका मिळाली. त्यानंतर रामायण मालिकेत प्रभू रामाची भूमिका मिळाली. यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि काही मालिकांमध्ये देखील ते झळकले.
कोणत्या राज्यातून किती उमेदवार? Arun Govil | Lok Sabha Election 2024
आंध्र प्रदेशातून सहा, बिहारमधून 17, गोवा-मिझोराम-सिक्कीममधून प्रत्येकी एक, गुजरातमधून सहा, हरियाणातून चार, हिमाचल-तेलंगणामधून प्रत्येकी दोन,
झारखंडमधून तीन, कर्नाटक-केरळमधून प्रत्येकी चार जणांची घोषणा करण्यात आली. ओडिशातून, राजस्थानमधून सात, उत्तर प्रदेशमधून 13 आणि पश्चिम बंगालमधून 19 उमेदवार आहेत.