Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका
Brahmastra 2 : सीक्वेलमध्ये रणबीर कपूरबरोबर त्याची पत्नी आलिया आणि एक्स गर्लफ्रेंड दोघीही असणार

Brahmastra 2 : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. रणबीर सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
त्यानंतर तो एप्रिल २०२७ पासून ‘ब्रह्मास्त्र २’च्या शूटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘ब्रह्मास्त्र २’ सिनेमामध्ये दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणचे अमृता हे पात्र सिक्वेलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोण ही सध्या गरोदर असल्याने तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर ती ‘ब्रह्मास्त्र २’ सिनेमामध्ये काम करण्याची शक्यता आहे.
रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र : पार्ट १ -शिवा’ चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री आलिया भट्टने स्क्रीन शेअर केली होती. रणबीर व आलियाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये रणबीर कपूरबरोबर त्याची पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंड दोघीही असणार आहेत. Brahmastra 2
पहिल्या चित्रपटात रणबीर कपूरच्या आईच्या भूमिकेशी संबंधित दाखवण्यात आलेली झलक दीपिका पादुकोणची असल्याची चर्चा यापूर्वीपासूनच होती. आता अयान मुखर्जी अमृता या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.
जर दीपिका या चित्रपटाचा भाग बनली, तर रणबीर कपूरसोबत तिची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मात्र, दीपिकाच्या कास्टिंगबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
रणबीर आणि दीपिका यांनी यापूर्वी ‘बचना ऐ हसीनों’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘तमाशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर आता दोघे ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. Brahmastra 2
हेही वाचा:







