मुंबई – काही दिवसांपूर्वी ‘नीरजा’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्याचा प्रकार समोर आला होता. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. गोरेगाव फिल्म सिटीमधील एका मराठी मालिकेच्या सेटवर थेट बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
बिबट्या येताच सेटवरील लोक घाबरून पळताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. काल (२६ जुलै) रोजी ही घटना घडल्याचे समजते. यावेळी सेटवर एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या आलेल्या ठिकाणी दोनशेहुन अधिक क्रिव्हमेंबर उपस्थित असल्याचे समजते.
गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सेटवर बिबट्या येण्याची ही तिसरी घटना असल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे कलाकारांसह सर्वच जण शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करत आहेत. बिबट्यामुळे या ठिकाणी अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#WATCH | A leopard, along with its cub, entered the sets of a Marathi TV serial in Goregaon Film City, Mumbai yesterday.
All Indian Cine Workers Association president Suresh Shyamlal Gupta says, “More than 200 people were present at the set, someone could have lost life. This… pic.twitter.com/m1YgSXARl6
— ANI (@ANI) July 27, 2023
बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीआयवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. गोरेगावच्या आसपास मोठ्या प्रमाणात वन असल्यामुळे हा बिबट्या जवळच्या मानव वस्तीत घुसत असल्याचा वर्तवला जात आहे.