Rajinikanth : दोन दिग्गज एकमेकांना भेटले, उद्धव ठाकरेंनी टिपला खास क्षण; ‘मातोश्री’वरील भेटीचा किस्सा
Rajinikanth : रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा नेहमीच लक्ष वेधून घेतो.

‘मातोश्री’वरील भेटीची झाली होती चर्चा
रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा नेहमीच लक्ष वेधून घेतो. बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी १५ वर्षांपूर्वी ते मातोश्रीवर पोहोचले, तेव्हाही त्यांच्या याच साधेपणाची चर्चा झाली होती. मोठा ताफा किंवा अवास्तव दिखाऊपणा न करता ते एका गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते.
भेटीचा खास क्षण उद्धव ठाकरेंनी कॅमेऱ्यात टिपला
त्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. या भेटीदरम्यान ठाकरे कुटुंबासोबत रजनीकांत यांनी फोटो काढले होते. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे आणि रजनीकांत यांच्या भेटीचा हा खास क्षण उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. या भेटीतील फोटो आणि त्यामागील आठवणी आजही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतात.
रजनीकांत यांचे मराठी चित्रपटाशी जोडले जाणार होते नाते?
रजनीकांत यांचे महाराष्ट्राशी असलेले नातेही विशेष आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असून, त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास पुढे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बहरला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर रजनीकांत यांनी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर ते मराठी चित्रपटात कधी दिसणार, याविषयीची चाहत्यांमध्ये उत्सुकता आजही कायम आहे.
चित्रपटांपलीकडेही रजनीकांत यांची लोकप्रियता
रजनीकांत यांची ओळख केवळ बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणारा अभिनेता एवढ्यापुरती मर्यादित नाही. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि चाहत्यांशी जोडलेल्या नात्यामुळेही ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असते.
India China Border: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन यांच्यात संघर्ष ; ITBP डीजींकडून मोठा खुलासा






