नवी दिल्ली – गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात अडीच वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये पडली होती. त्या मुलीला वाचवण्यासाठी लष्कराच्या जवानांकडून बचाव मोहीम राबवली जात होती, ती यशस्वी झाली आणि मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र नंतर या चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला.
गुजरातमधील देवभूमी द्वारका येथे मुलगी बोअरवेलमध्ये पडली आणि ती 30 ते ३५ फूट आत खाली पडली होती आणि तिला वाचवण्यासाठी लष्कराचे जवान आणि स्थानिक अधिकारी यांची अनेक पथके मदतकार्यात गुंतली होती. रान या गावात सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
संबंधित बोअरवेल उघडी होती, त्यामुळे मुलगी त्यात पडली. तिला ऑक्सिजन दिला जात होता. तिला वाचवण्यासाठी आलेले लष्कराचे जवान सर्व शक्तीनिशी बचाव कार्यात गुंतले. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अशा सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर चिमुरडीची सुटका करण्यात यश मिळाले.
रात्री पावणेदहाच्या सुमारास तिला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र तिचा मृत्यू झाला आहे. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.