भारतमातेची डिजीटल प्रतिमा सर्व विमानतळांवर बसवावी; राहुल शेवाळेंची अमित शहांकडे मागणी
Updated On:

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजीटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतची माहिती एक्स अकाऊंटवरून दिली आहे. शेवाळे म्हणाले, भारतमातेची प्रतिमा देशभरातील विमानतळांवर लावल्यामुळे जगभरात भारताचा समृध्द वारसा, राष्ट्रप्रेम आणि ऐक्य याबाबत अनोखा संदेश जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे या मागणीच्या अंमलबजावणीसाठी संबधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती माननीय गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी केली आहे.




