Mumbai : मध्यरात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन वाजला अन्…; मुंबईत खळबळ
Mumbai : या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्ष आणि मुंबई पोलिसांना माहिती दिली.

Mumbai : मुंबईच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी मध्यरात्री आलेल्या एका निनावी फोनमध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२५ जून) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्ष आणि मुंबई पोलिसांना माहिती दिली.
धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. रेल्वे स्थानके, विमानतळ, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : Girija Oak: पिवळ्या साडीत गिरिजा ओकचा मोहक अंदाज; ‘नॅशनल क्रश’च्या पारंपरिक लूकने चाहत्यांना घातली भुरळ
दरम्यान, ज्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचा फोन करण्यात आला होता, तो क्रमांक शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, प्राथमिक तपासात तो क्रमांक बंद असल्याचे समोर आले आहे. सायबर सेल आणि स्थानिक पोलीस पथके संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास करत असून त्याचे लोकेशन शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन (Mumbai)

Mumbai : मध्यरात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन वाजला अन्…; मुंबईत खळबळ
मुंबई पोलीस यंत्रणा या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. ही धमकी केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे कोणते मोठे कारस्थान आहे, याचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सध्या संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली असून परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
हेही वाचा : Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! सिया गोयलचा धक्कादायक खुलासा





