Union Cabinet Expansion : मोठी बातमी! महाराष्ट्रातील दोन खासदारांना केंद्रांत संधी मिळणार? नाव आली समोर, निर्णयाकडे लक्ष
Union Cabinet Expansion : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अलीकडेच भेट घेतल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

Union Cabinet Expansion : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील दोन खासदारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि संजय दिना पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सर्व स्तरांवर चर्चा पूर्ण झाली असून केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अलीकडेच भेट घेतल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. कोणत्याही क्षणी याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) सोडून सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. या घडामोडींमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सतत या खासदारांच्या संपर्कात होते.
हेही वाचा : Mouni Roy: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनी रॉयचं मोठं वक्तव्य; ‘माफ करा आणि आयुष्यात पुढे चला’
मोदींचा पहिला कार्यकाळ – ५ जुलै २०१६ रोजी झालेला फेरबदल
मोदींचा दुसरा कार्यकाळ – ६-७ जुलै २०२१ रोजी झालेला मंत्रिमंडळ फेरबदल
त्यामुळे आता जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कुणाकोणाला स्थान दिले जाते. याविषयी चर्चा झडू लागली असून, लवकरच याबाबत मोठी बातमी येऊ शकते. मात्र, सध्या तरी याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ठाकरेंचे आमदारही फुटणार?
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर ३.०’ या नावाने ठाकरे गटातील आमदारांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत १४ ते १५ आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून ते ठाकरे गटापासून वेगळे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची भेट नेमक्या कोणत्या आमदारांनी घेतली, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतं याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Rajkumar Hirani : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! दिग्दर्शकाने ‘मुन्नाभाई 3’ विषयी दिली मोठी अपडेट






