मुंबई : स्टेट बॅंकेच्या मदतीने येस बॅंकेला मदत दिली जाणार असली तरी या बॅंकेवर असलेला बुडित कर्जाचा भार सन 2021 च्या वित्तीय वर्षातही कायम राहणार आहे. या बॅंकेत केंद्र सरकारच्या पुढाकाराने दहा हजार कोटी रूपयांचे भांडवल गुंतवण्यात येत असल्याने ही बॅंक तरण्यास मदत होईल अशी आशा या बॅंकेचे नियोजित सीईओ प्रशांतकुमार यांनी म्हटले आहे.
गेल्या सहा महिन्यात या बॅंकेतून खातेदारांनी 72 हजार कोटी रूपये काढून घेतले आहेत. येत्या बुधवारी या बॅंकेवरील पैसे काढून घेण्याच्या संबंधातील निर्बंध मागे घेतले जाणार आहेत.
त्याच दिवशी प्रशांतकुमार हे या बॅंकेचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तथापी बॅंकेवरील बुडित कर्जाचा जो भार कायम राहणार आहे त्यावर आता बॅंकेला उपाययोजना करावी लागणार आहे.