पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती पिंपरी न्यायालयात साजरी करण्यात आली. या वेळी वकील बार रूममधील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण वंदन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान यावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाची सांगता संविधानाची प्रास्तवना वाचन करून झाली. त्यानंतर पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड अॅड. बार असोसिएशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
या वेळी पिंपरी चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, माजी उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, अॅड. नितीन क्षीरसागर, अॅड. शंकर घंगाळे तसेच मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष अॅड. प्रतीक्षा खिलारी, सचिव अॅड. धनंजय कोकणे, सह-सचिव अॅड. उमेश खंदारे व विद्यमान कार्यकारणी यांनी केले.