नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक माहिती संकलित करणे, मूल्यांकन व आवश्यक तांत्रिक सेवा संगणकीकरण करणे याकरीता विविध आज्ञावली विकसित करुन पुरविणे, तांत्रीक पुरवठा व इतर अनुषंगिक कामे करणे बाबत निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिका स्तरावर विविध प्रक्रिया राबवून कामाचे कार्यादेश देण्यात आले असून अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व जमिनी, मालमत्तांचे सर्व्हेक्षण होणार आहे.
अहमदनगर मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे, जिओ टॅगींग तसेच अंतर्गत-बाह्य मोजमापांसाठी आणि त्यांचे कारपेट, बिल्डअप क्षेत्र डिजिटल उपकरण मोजमापणाद्वारे मोजमाप करण्यात येणार आहे, सदर काम हे मे.सी. ई. इन्फो सिस्टीम लि. नवी दिल्ली या कंपनीस देण्यात आले आहे.
महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी मालमत्ता सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासून त्यांना मालमत्ता कर सर्व्हे क्षणासाठी सहकार्य करावे आणि त्यांना आवश्यक ती माहिती देण्यात यावी.
दरम्यान या मोहिमेमुळे अहमदनगर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. तसेच सव्र्व्हेक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर लेखी तक्रार दाखल करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासकांनी केले आहे.