पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी न्यायालयात ई फायलिंग व सुविधा केंद्र, मेडिएशन सेंटर व उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले. बार काउंन्सिल ॲाफ महाराष्ट्र आणि गोवा तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संविधानाचे प्रास्तविक वाचन करून व झाडाच्या रोपट्याला पाणी अर्पण करून झाली.
या वेळी पुणे जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, पिंपरी-चिंचवडचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील, बार काउंन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. अहमद पठाण, पुणे जिल्हा ई फाइलिंग प्रमुख ॲड. पृथ्वीराज थोरात,
नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, आर. एम. गिरी, बी. डी. चौखंट, एम. जी. मोरे, पी. सी. फटाले, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड आदी उपस्थित होते. या वेळी ॲड.दिपाली गाडे, ए. एम.आवळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ॲड.राजेंद्र उमाप, सोनल पाटील, पुणे जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
पिंपरी महापालिकेचे जनता अधिकारी प्रफुल्ल पुराणीक व नोडल अधिकारी मुकेश कोळप यांनी मतदानाची शपथ दिली.या वेळी पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.सुदाम साने, ॲड.किरण पवार, ॲड.अतिश लांडगे, ॲड.संगीता परब, ॲड.मंगेश खराबे, ॲड.पल्लवी विघ्ने, ॲड.मेरी रणभीसे, ॲड.सुजाता बिडकर, ॲड.संघर्ष सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले , उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अय्याज शेख, ॲड फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड अस्मिता पिंगळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले. आभार उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी यांनी मानले.