मुंबई – सोशल मीडियावर अनेकदा फिल्म स्टार्सचे (Bollywood star) डुबलीकेट्स पाहायला मिळतात. यामध्ये शाहरुख,सलमान,आमिर,सानी देओल अशा सगळ्या सेलेब्रेटींचा समावेश आहे.परंतु खऱ्याखुऱ्या स्टार्स प्रमाणे दिसणारे हे नकली स्टार्स जेव्हा खऱ्या सुपर स्टार्सना भेटतात तेव्हा एक वेगळीच मजा येते. असाच बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानच्या डुबलीकेटचा खऱ्या सलमान खानला भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (SRK)
सध्या शाहरुख खानच्या (Shah rukh khan) डुबलीकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खानही दिसत आहे. त्याचा मित्र शाहरुखचा लूक पाहून सलमानला हसू अनावर झाले आणि व्हिडिओमध्ये तो जोरजोरात हसताना दिसत आहे. ही व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे, “पठाण आणि टायगर इज हेअर” हे ऐकून सलमान तोंडावर हात ठेवतो आणि हसायला लागतो. (Salman khan meet srk dublicate)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावर लोक भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, शाहरुखचा फॅन असल्याने हे पाहून हसू आवरत नाही. दुसर्या युजरने लिहिले, भाय-भाय. तिसर्याने लिहिले, थकलेला पठाण. अशा अनेक फनी कमेंट यावर युजर्सने दिल्या आहेत.
Pathaan n Tiger r here😂 #SalmanKhan says”Dal Fry”😂 pic.twitter.com/vYUe1zWWH4
— ✨Salmanic… ✨🦋Yani🦋✨….👊😡 (@PriyaniMahapat2) November 28, 2023
टायगर 3 कमाईचा वेग मंदावला
सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट ‘टायगर 3’ 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 16 दिवसांत 273.80 कोटींचा व्यवसाय केला आहे. वीकेंडनंतर सोमवारी या चित्रपटाची स्थिती काहीशी वाईट दिसली.