NDA government | Pakistan – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तथापि, त्यांच्या या शपथविधी सोहळ्यापूर्वीच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दावा केला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे असलेले फवाद चौधरी यांच्या म्हणण्यानुसार मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे भारताचे पहिले पंतप्रधान असतील.
फवाद चौधरी म्हणाले की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या विचारसणीत फरक आहे. विचारसरणीतील हा फरकच संकेत देतो की हे सरकार फार काळ टिकणार नाही. आघाडीची एकता विखंडीत होणे निश्चित आहे. भारतातील इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी हे त्या देशाचे पुढचे पंतप्रधान असतील.
दरम्यान, चौधरी यांनी असेही म्हटले आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना सिंधु खोऱ्यात आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. ही आव्हाने डोळ्यासमोर ठेवून दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पाणी या विषयावर सहकार्य कायम ठेवण्यात जर अपयश आले तर ते पूर्ण विभागातील अस्थिरतेचे कारण ठरेल.