Samsung Galaxy A05 : सॅमसंगने ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी A05 हा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या उपकरणाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy A05 मध्ये MediaTek प्रोसेसर आणि HD Plus पॅनेलसह पॉवरफुल बॅटरी आहे. Samsung Galaxy A05 च्या एक महिना आधी कंपनीने Samsung Galaxy A05s लॉन्च केला होता, दोन्ही मॉडेल्सची रचना जवळपास सारखीच आहे पण फीचर्स मध्ये फरक असेल. Galaxy A05 ची किंमत आणि या हँडसेटमध्ये कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत – विशेष म्हणजे डिवाइसची किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु होते. या सॅमसंग मोबाइल फोनच्या 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे, तर 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये काळा, हिरवा आणि सिल्व्हर रंग उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A05 मोबाइलमध्ये 6.7 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1600 X 720 पिक्सल रिजॉल्यूशन आणि आणि १16 मिलियन कलरला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन ड्युअल सिम 4जी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, जीपीएस सारख्या अनेक फीचर्ससह आला आहे. ह्यात मीडियाटेक जी85 प्रोसेसरचा वापर केला आहे. डिव्हाइसमध्ये6 जीबी पर्यंत रॅमसह 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो.
कॅमेरा – यात ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात 50मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 25 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. यात यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी उपलब्ध आहे.