मुंबई – ‘लॉक अप’ फेम पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती पाणीपुरी खाताना दिसत आहे. डाएटिंग लक्षात घेऊन तिने चीट डे साजरा केल्याचे समजते. पूनम मुंबईतील एका स्पॉट झाली यावेळी तिने कलरफुल शॉर्ट स्कर्टसोबत पांढरा बॅकलेस टॉप घातला होता. पारदर्शक फ्रेमच्या सनग्लासेसने तिचा लूक आणि सुंदर दिसत होता. पूनमला मुंबईतील एका स्टॉलवर पाणीपुरी खाताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
‘चिट डे साठी एव्हढ्या पाणीपुरी बस आहेत’ असं म्हणत पूनमने यावेळी पाणीपुरीवर चांगलाच ताव मारल्याचे दिसून आले. अभिनेत्रीला सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर पाहून सर्वांना आश्चर्य व्यक्त केलं. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
पूनम पांडे या वर्षी खूप चर्चेत होती. कंगना रानावतच्या ‘लॉक अप’ या हिट रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाला होती. ती शोच्या टॉप 8 स्पर्धकांमध्ये सामील झाली पण ती शो जिंकू शकली नाही. मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला. पूनमने मुनव्वर यांच्या विजयासाठी आग्रही असल्याचे देखील उघडपणे सांगितले होते.