Raj Thackeray : मुंबई महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणार यात काही शंका नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून, रणनिती आखली आहे. बड्या नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या सगळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती देखील महत्वाची मानली जात आहे. या युतीत ५३ जागा राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लढवणार आहे. या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्वाची घडामोड घडली आहे. मनसेच्या ५३ नगरसेवकांनी थेट कृष्णकुंज गाठत पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांनी ५३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना तीन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. “मुंबई मराठी माणसाची आहे. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा,” “तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशांची आमिष दाखवली जातील. मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.” “मुंबई मराठी माणसाची आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथला आपली 10 लोकं उभी करा. बोगस मतदान झाले नाही पाहिजे, यासाठी तुम्ही सतर्क राहा. जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा.” राज ठाकरेंचा खुलासा हे तीन सल्ले देताना राज ठाकरे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. “मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं,” असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता मनसेच्या ५३ उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर मनसे उमेदवारांसाठी पूर्ण ताकद लावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याला कितपत यश निवडणुकीत मिळणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. हेही वाचा : Beauty & Skin: २ लवंगांच्या कळ्यांनी त्वचेला येईल नैसर्गिक तेज, देसी डिटॉक्स ड्रिंकने २१ दिवसांत दिसेल फरक