पुणे जिल्हा | लोणारवाडीत २५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड

मलठण, (वार्ताहर)- लोणारवाडी (ता. दौंड) येथे बुधाराणी हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमाने मौजे लोणारवाडी येथे (स्व) तुकाराम लक्ष्मण धगाटे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मोफत डोळे तपासणी व शस्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यावेळी १५० रुग्णांनी सहभाग नोंदवला. यामध्ये २५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांची बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे शस्रक्रिया करण्यात येणार आहे.
वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विठ्ठल रुक्मिनी मंदिरामध्ये सात दिवस श्रीमद भागवत कथा अभियंता महेश धगाटे यांनी आयोजित केली होती. कथा प्रवक्ते श्रीक्षेत्र वृंदावन श्रीमान रमेश बाबा महाराज (बरसाना) यांच्या मान मंदिर येथील लक्ष्मण बाबा महाराज यांच्या रसाळ वाणीतून कथा सपन्न झाली. यावेळी शेकडो भाविकांनी या कथेचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांना डोळे तपासणीसाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये बऱ्याच रुग्णांनी सहभाग नोंदवला. गेल्या सात दिवस लोणारवाडी येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले होते. याचाही अनेक भाविकांनी लाभ घेतला. – पूजा महेश धगाटे, सदस्य ग्रामपंचायत, लोणारवाडी.





