पुणे जिल्हा | टोमॅटो उत्पादकांना आधुनिकतेचे धडे

मलठण, (वार्ताहर)- दौंड तालुक्यात टोमॅटो पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. अपुऱ्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे शेतकरी बांधवांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, याचा विचार करून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), फ्रूटवाला बागायतदार व सिद्धिविनायक हायटेक नर्सरी यांच्या वतीने मौजे बोरीबेल येथे शेतकरी प्रशिक्षणास प्रतिसाद मिळाला.
यावेळी अभिजित पाटील यांनी खत व अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी तसेच किड व रोग व्यवस्थापन याविषयी प्रतीक मोरे, टोमॅटोच्या विषाणूजन्य रोगांबद्दल व टोमॅटो नोंदवही याबाबत गणेश नाझीरकर यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी पीक विमा, बाजरी व मका पीक स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी दिनेश फडतरे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, कृषी पर्यवेक्षक युसुफ तडवी, कृषी सहायक रवी तापकिरे, कृषी सहायक राजू जगदाळे, इन्सेक्टिसाईड इंडिया लिमिटेडचे प्रतीक मोरे, मान्सून क्रॉप सायन्सचे अविनाश पाटील, फ्रुट्वाला बागायतदारचे गणेश नाझिरकर,
सरपंच नंदकिशोर पाचपुते, गोरख रसाळ, सचिन नागवडे, बाळकृष्ण पाचपुते, आबा नरुटे, गणेश रसाळ, संतोष पाचपुते, नितीन शेळके, वासुदेव पाचपुते, रामचंद्र साळुंके, कल्याण पाचपुते, मधुकर पाचपुते, हनुमंत पाचपुते, घनश्याम पाचपुते, अनिल महाडिक परिसरातील शेतकरी उपस्थित होते. बापू महाडिक यांनी स्वागत केले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी प्रास्ताविक केले. डी. के. खळदकर यांनी आभार मानले.





