Maya Beats Serena : विम्बल्डनमध्ये सर्वात मोठा उलटफेर! २० वर्षीय मायानं दिग्गज सेरेना विल्यम्सला पहिल्याच फेरीत नमवलं
Maya Beats Serena : सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात मायानं २३ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला.

Maya Joint Beats Serena Williams Wimbledon 2026 First Round Result : विम्बल्डन २०२६ टेनिस स्पर्धेच्या (Wimbledon 2026) पहिल्याच फेरीत टेनिस जगताला हादरवून टाकणारा एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय युवा खेळाडू माया जॉइंट (Maya Joint) हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात मायानं २३ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) हिचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला. या पराभवासोबतच ७ वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या सेरेनाचे सिंगल्समधील पुनरागमन पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यापासून सलग ११ सामने गमावल्यानंतर माया या स्पर्धेत उतरली होती.
सेरेनाचा झुंजार लढा, पण मायानं तोडला सर्व्हिसचा कणा!
४४ वर्षीय सेरेना विल्यम्सने दुसऱ्या सेटच्या टाई-ब्रेकमध्ये पहिला मॅच पॉईंट वाचवला आणि निर्णायक सेटमध्ये आघाडीही घेतली होती. मात्र, मायाच्या आक्रमक खेळापुढे तिचा टिकाव लागला नाही. मायाने सेरेनाच्या ताकदीचा चोख मुकाबला करत तिच्या बलाढ्य सर्व्हिसला तब्बल ५ वेळा मोडीत काढले (ब्रेक केले) आणि सामन्यात १० अप्रतिम ‘ऐस’ (Aces) लगावले. मायाचा पुढील मुकाबला आता अलेक्झांड्रा एला हिच्याशी होणार आहे.
Maya Joint takes down Serena Williams in three sets in the legend’s return to Wimbledon‼️ pic.twitter.com/fOnON4NkRX
— ESPN (@espn) June 30, 2026
२०२२ नंतर कोर्टवर पुनरागमन; आता बहिणीसोबत डबल्स खेळणार –
View this post on Instagram
सेरेना विल्यम्सने तब्बल १,३९७ दिवसांनंतर (२०२२ च्या यूएस ओपननंतर) पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सिंगल्स सामना खेळला. २००४ मध्ये ४७ व्या वर्षी खेळणाऱ्या मार्टिना नवरातिलोवा यांच्यानंतर विम्बल्डनच्या इतिहासातील सेरेना ही दुसरी सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरली आहे. या पराभवानंतरही सेरेना ऑल इंग्लंड क्लबमध्येच थांबणार असून, ती आपली बहीणव्हीनस विल्यम्ससोबत डबल्स सामन्यात खेळताना दिसेल.
सामन्यानंतर सेरेना म्हणाली, “विम्बल्डनमध्ये पुनरागमन करणे अद्भुत होते. मी पुन्हा येथे खेळू शकेन असा विचारही केला नव्हता. मी या कोर्टवरील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेतला.”





