Serena Williams Comeback : टेनिस कोर्टवर पुन्हा घोंगावणार ‘सेरेना’ वादळ! ‘या’ दिवशी करणार पुनरागमन
जगातील दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams Comback) सुमारे चार वर्षांनंतर पुन्हा एकदा व्यावसायिक टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

Serena Williams Comeback : टेनिस जगतातून एक अत्यंत मोठी आणि क्रीडाप्रेमींना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. जगातील दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams Comeback) सुमारे चार वर्षांनंतर पुन्हा एकदा व्यावसायिक टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.
वयाच्या ४४ व्या वर्षी २३ ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे नावावर असणाऱ्या सेरेनाने (Serena Williams Comeback) लंडनमध्ये होणाऱ्या आगामी ‘क्वीन्स क्लब ग्रास-कोर्ट’ स्पर्धेत दुहेरी खेळण्यासाठी वाईल्ड कार्ड स्वीकारले आहे. विमेन्स टेनिस असोसिएशनने सोमवारी अधिकृतपणे यावर शिक्कामोर्तब केले.
८ जूनपासून क्वीन्स क्लब स्पर्धेला सुरुवात; जोडीदार अद्याप गुलदस्त्यात
लंडनमधील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप्स’ यंदा ८ जूनपासून सुरू होत आहे. १८८६ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा जगातील सर्वात जुन्या ग्रास कोर्ट स्पर्धांपैकी एक असून, विम्बल्डनची पूर्वतयारी म्हणून याकडे पाहिले जाते.
या स्पर्धेत सेरेना (Serena Williams Comeback) दुहेरी सामन्यांमध्ये खेळणार असली, तरी तिचा जोडीदार कोण असेल? याचे नाव WTA ने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, सेरेनाने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत या पुनरागमनाचे संकेत दिले. यात तिचा फोन सतत वाजत असल्याचे दिसत असून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, *”वाटतंय सगळ्यांना ही बातमी मिळाली आहे.”*
विम्बल्डन खेळण्याच्या अटकळींना वेग
सेरेना विल्यम्सने अखेरचा सामना २०२२ च्या ‘यूएस ओपन’मध्ये खेळला होता. त्यानंतर टेनिसला अलविदा करताना तिने ‘रिटायरमेंट’ हा शब्द वापरण्यास नकार दिला होता. आता ती थेट ग्रास कोर्टवर परतत असल्याने, २८ जूनपासून सुरू होणाऱ्या ‘विम्बल्डन’मध्येही ती खेळू शकते, अशा अटकळींना प्रचंड वेग आला आहे. सेरेनाने ऑल इंग्लंड क्लबवर (विम्बल्डन) आतापर्यंत ७ वेळा एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
‘अँटी-डोपिंग’ चाचणीनंतर पुनरागमनाचा मार्ग मोकळा
१४ ग्रँड स्लॅम दुहेरी विजेतेपदे जिंकणाऱ्या सेरेनाने ६ महिन्यांपूर्वीच टेनिसच्या अनिवार्य ‘अँटी-डोपिंग’ कार्यक्रमात पुन्हा नोंदणी केली होती. व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिने ही चाचणी पूर्ण केल्यामुळेच तिच्या कोर्टवरील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रीडा जगतात आनंदाचे वातावरण: दिग्गज आणि युवा खेळाडू काय म्हणाले?
मार्टिना नवरातिलोव्हा (माजी वर्ल्ड नंबर-१)
“सेरेनाने टेनिसला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. वयाच्या मर्यादा ओलांडून ती पुन्हा खेळण्यासाठी येत आहे, ही टेनिस खेळासाठी अत्यंत अद्भुत गोष्ट आहे.” विशेष म्हणजे, यापूर्वी सर्वाधिक वयात (४३ वर्षे १० महिने) पुनरागमन करण्याचा विक्रम नवरातिलोव्हा यांच्या नावावर होता.
नाओमी ओसाका (४ वेळा ग्रँड स्लॅम विजेती)
“सेरेनाच्या पुनरागमनामुळे लोक पुन्हा मोठ्या संख्येने टेनिस पाहू लागतील. मी तिचा पहिला सामना नक्कीच पाहणार. सेरेना आणि व्हीनस माझ्या बालपणापासूनच्या रोल मॉडेल आहेत.”
कोको गॉफ (फ्रेंच ओपन चॅम्पियन)
“माझ्या कारकिर्दीत मला कधीही सेरेनाविरुद्ध खेळायला मिळाले नाही, याची खंत नेहमी राहील. पण अशा दिग्गज खेळाडूचे कोर्टवर परतणे ही खेळासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.”
इवा जोविक (१८ वर्षीय युवा खेळाडू)
“मी लहानपणापासून सेरेनाला टेनिसवर राज्य करताना पाहिले आहे. तिला प्रत्यक्ष कोर्टवर खेळताना पाहणे हा एक अविश्वसनीय अनुभव असेल.”






