IND vs BAN 2nd Test (4th Day,Stumps ) : चौथ्या दिवशी 18 विकेट्स अन् 437 धावा, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर….

IND vs BAN 2nd Test, Stumps on Day 4 in Kanpur : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटीचा चौथा दिवस संपला आहे. भारताने पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला आणि शेवटच्या सत्रात बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 26 धावा केल्या आहेत तर चौथ्या दिवसअखेर शादमान इस्लाम नाबाद 7 आणि पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक हा अद्याप खातेही उघडू शकलेला नव्हता.
तत्पूर्वी,बांगलादेश दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा शदमान इस्लाम आणि झाकीर हसन विकेट वाचवण्याच्या इराद्याने खेळताना दिसले. पण रविचंद्रन अश्विनने या बचावात्मक रणनीतीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या फिरणाऱ्या चेंडूंनी दुसऱ्या डावात बांगलादेशचे 2 बळी घेतले. बांगलादेशनं झाकीर हसन (10) आणि हसन महमूद (04) यांच्या रूपानं 2 गडी गमावले आहेत. भारत अजूनही 26 धावांनी पुढे आहे. अशा स्थितीत भारताच्या विजयाच्या आशा पाचव्या दिवशी जागृत झाल्या आहेत. चौथ्या दिवसाच्या खेळात एकूण 18 विकेट पडल्या आणि दिवसभरात एकूण 437 धावा झाल्या. त्यामुळे भारत-बांगलादेश दुसरी कसोटी अतिशय रोमांचक वळणावर पोहोचली आहे.
भारताने बांगलादेशला स्वस्तात गुंडाळलं…
पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी मात्र पाऊस थांबला आणि खेळास सुरूवात झाली. बांगलादेशने 3 बाद 107 धावसंख्येवरून पुढे सुरुवात केली. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच 11 धावा करून मुशफिकुर रहीम बाद झाला, पण मोमिनुल हक दुसऱ्या टोकाकडून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने 107 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाला 233 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. मोमिनुल दमदार कामगिरी करत शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 194 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. मोमिनुलने या कालावधीत 17 चौकार आणि एक षटकार मारला. अखेर जडेजाने खालिद अहमदला शुन्यावर बाद करून बांगलादेशचा डाव संपवला आणि त्याचे 300 कसोटी बळी पूर्ण केले.
बुमराह-सिराजची दमदार कामगिरी…
बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 18 षटकात 50 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणि आकाश दीप यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. याव्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 15 षटकात 45 धावा देत 2 तर रवींद्र जडेजाने 9.2 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.
जडेजाचे 300 बळी…
दुसऱ्या लढतीच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने खालेद अहमदला बाद करून कसोटीमध्ये 300 बळींचा टप्पा पार केला. 300 बळी व 3 हजारपेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला डावखुरा भारतीय खेळाडू ठरला. त्याने 73 कसोटी लढतीमध्ये ही कामगिरी करून दाखविली. त्याबरोबरीने वेगवान 300 बळी घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अश्विनने 54, अनिल कुंबळेने 66 तर हरभजन सिंगने 72 कसोटीमध्ये हा टप्पा पार केला होता.
ENG vs AUS 5th ODI : हेडची अष्टपैलू कामगिरी, इंग्लंडला नमवून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर केला कब्जा..
भारतीय फलंदाजांची टी-20 सारखी फलंदाजी…
कानपूर कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी सलामीला आले. त्यांनी कसोटीमध्ये टी-20 सारखी फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात तीन चौकार मारले, मात्र यानंतर रोहितने येताच खळबळ उडवून दिली. भारतीय कर्णधाराने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरही त्याने आणखी एक लांबलचक षटकार मारला. रोहित आणि जैस्वाल या जोडीने अवघ्या 18 चेंडूत संघाची धावसंख्या 50 पार नेली. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. मात्र त्यानंतर रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला.
That’s Stumps on Day 4 in Kanpur!
Stage set for an action-packed final day of Test cricket ⏳
Bangladesh 26/2 in the 2nd innings, trail by 26 runs.
Scorecard – https://t.co/JBVX2gz6EN#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bbpsdI2jaJ
— BCCI (@BCCI) September 30, 2024
या धमाकेदार सुरुवातीनंतर, भारताचा धावांचा वेग कमी झाला नाही. भारताने अवघ्या 10.1 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला. या कामगिरीने केवळ एक नवीन विक्रमच स्थापित केला. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना भारताने 2023 मध्ये 12.2 षटकांत 100 धावा केल्या होत्या. तो विक्रम देखील आज मागे पडला. वेगवान अर्धशतकाचा विक्रम देखील आज भारताच्या सलामीवीरानी मोडला. इंग्लंडने ट्रेंट ब्रिज येथील कसोटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 4.2 षटकांत 50 धावा केल्या होत्या. आज भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी 19 चेंडूत 50 धावांची सलामी दिली.
IND vs BAN 2nd Test : कोहलीनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम, 35 धावा करताच रचला इतिहास….
रोहित बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालही 51 चेंडूत 12 चौकार अन् 2 षटकारासह 72 धावा काढून बाद झाला.यानंतर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. यानंतर विराट कोहलीच्या आधी मैदानात आलेला ऋषभ पंत 9 धावा करून बाद झाला. यानंतर कोहली आणि केएल राहुलने डाव वेगाने पुढे नेला, पण नंतर 35 चेंडूत 47 धावा करून कोहली बाद झाला. यानंतर जडेजा 8 आणि अश्विन 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आकाश दीपने 12 धावांचे योगदान दिले. शेवटपर्यंत फलंदाजी करताना केएल राहुल 43 चेंडूत 7 चौकार अन् 2 षटकारासह 68 धावा करून बाद झाला. यानंतर भारताने 9 बाद 285 धावसंख्येवर डाव घोषित केला. यादरम्यान बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि शकिब अल हसन यांनी सर्वाधिक 4 बळी घेतले. तर हसन महमूदला 1 यश मिळाले.





