ENG vs AUS 5th ODI : हेडची अष्टपैलू कामगिरी, इंग्लंडला नमवून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर केला कब्जा..

England vs Australia 5th ODI :- ट्रेव्हिड हेडच्या अष्टपैलू कामगिरीने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर डीएलएसनुसार ४९ धावांनी विजय मिळविताना ५ एकदिवसीय सामान्यांची मालिका ३-२ अशी जिंकली. यापूर्वी दोन्ही संघांनी २-२ अशी बरोबरी केली होती.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने बेन डकेटच्या शतकी खेळीच्या जोरावर ४९.२ षटकांत सर्व बाद ३०९ धावांचा डोंगर उभा केला. बेन डकेटने धडाकेबाज १०७ धावांच्या खेळीत १३ चौकार व २ षटकार लगावले. कर्णधार हॅरी ब्रुकने देखील ६२ धावांची खेळी ३ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने सजविली.
फील सॉल्टने ५ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ४२ , तर आदिल रशीदने ४ चौकारांच्या साहाय्याने ३६ धावांची खेळी करताना इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने ४, आरोन हार्डी, ऍडम झाम्पा व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करताना २०.४ षटकांत २ बाद १६५ धावा केल्या असताना पावसाचे आगमन झाले. त्यावेळी डीएलएसनुसार ४९ धावांनी ऑस्ट्रेलिया संघ पुढे होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयी घोषित करण्यात आले.
ऑस्ट्रेलिया संघाकडून मॅथ्यू शॉर्टने आक्रमक ५८ धावांची खेळी करताना ७ चौकार व ४ षटकार लागले. ट्रेव्हिस हेडने ४ चौकार व २ षटकार लागवताना ३१ धावांची खेळी केली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथने नाबाद ३६ (४ चौकर, १ षटकार), जोश इंग्लिस नाबाद २८ (२ चौकार, २ षटकार) धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलिया संघाची अजून पडझड होऊ दिली नाही. अष्टपैलू कामगिरीसाठी ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
The rain hit just four balls after the 20 overs required to constitute a match but Matt Short and Travis Head had the Aussies well and truly on track for a 3-2 series victory! #ENGvAUS pic.twitter.com/AsyMPWrxll
— cricket.com.au (@cricketcomau) September 29, 2024
संक्षिप्त धावफलक :-
इंग्लंड : ४९.२ षटकांत सर्वबाद ३०९ : बेन डकेट १०७ (१३ चौकार, २ षटकार), हॅरी ब्रुक ७२ (३ चौकार, ७ षटकार), फील सॉल्ट ४२ (५ चौकर, ३ षटकार) आदिल रशीद ३६ (४ चौकार), ट्रेव्हिस हेड ६.२-२८-४, आरोन हार्डी ५-१-३८-२, ऍडम झाम्पा १०-०-७४-२, ग्लेन मॅक्सवेल १०-०-४९-२.
Athletics : आता लक्ष्य… टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपचे… – नीरज चोप्रा
ऑस्ट्रेलिया : २०.४ षटकांत २ बाद १६५ : मॅथ्यू शॉर्ट ५८ (७ चौकार, ४ षटकार), स्टीव्हन स्मिथ नाबाद ३६ (४ चौकर, १ षटकार), ट्रेव्हिस हेड ३१ (४ चौकार, २ षटकार), जोश इंग्लिस नाबाद २८ (२ चौकार, २ षटकार), मॅथ्यू पॉट्स ७-०-४९-१, ब्रायडॉन कार्स ५-०-३६-१.





