IND vs BAN : मुस्तफिजुर रहमानने रचला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला बांगलादेशचा पहिलाच खेळाडू

IND vs BAN Mustafizur Rahman 150 T20I 1wickets Complete : आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात भारताविरुद्ध खेळताना बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झाकेर अलीच्या हाती झेलबाद करुन बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यासह त्याने शाकिब अल हसनचा १४९ विकेट्सचा रेकॉर्ड मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १५० विकेट्स पूर्ण केल्या.
मुस्तफिजुर रहमानने हा विक्रम आपल्या ११८ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केला. या सामन्यात त्याने चार षटके टाकून ३३ धावा दिल्या आणि एक विकेट्स घेतली. भारताने बांगलादेशला १६८ धावांचे टार्गेट दिले असून, मुस्तफिजुरची ही कामगिरी बांगलादेशसाठी महत्त्वाची ठरली. त्याच्या या यशामुळे तो जगातील चौथा गोलंदाज बनला, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय १५० विकेट्स घेतल्या आहेत. त्यापूर्वी अफगाणिस्तानचा राशिद खान (१७३), न्यूझीलंडचा टिम साउथी (१६४) आणि ईश सोधी (१५०) यांनी हा पराक्रम केला आहे.
Mustafizur Rahman has gone past Shakib Al Hasan to become Bangladesh’s leading wicket-taker in T20Is.#AsiaCup2025 #MustafizurRahman pic.twitter.com/AiBu8d4irG
— Circle of Cricket (@circleofcricket) September 24, 2025
बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्टीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- मुस्तफिजुर रहमान – १५०
- शाकिब अल हसन – १४९
- तस्कीन अहमद – ९९
- महेदी हसन – ६१
- शोरीफुल इस्लाम – ५८
हेही वाचा – IND vs BAN : अभिषेक शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा सर्वात मोठा विक्रम! रोहित-आफ्रिदीलाही टाकलं मागे
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- राशिद खान (अफगाणिस्तान) – १०३ सामने- १७३ विकेट्स
- टिम साउथी (न्यूझीलंड) – १२६ सामने- १६४ विकेट्स
- ईश सोधी (न्यूझीलंड) -१२६ सामने- १५० विकेट्स
- मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश) – ११८ सामने- १५० विकेट्स
- शाकिब अल हसन (बांगलादेश) – १२९ सामने- १४९ विकेट्स
हेही वाचा – IND vs BAN : अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये रचला इतिहास, युवराज-रोहितला टाकले मागे!
मुस्तफिजुरने एशिया कपमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत १५ षटके टाकली असून, ९० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आहेत. शेवटच्या सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने चार षटकांत २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या.





