Sanjay Raut : दोन आमदारांनी सांगितलं, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; संजय राऊत म्हणतात “ज्यांना भाजपच्या…”
Sanjay Raut : या दोन आमदारांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा शमल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Raut : शिवसेनेतील अंतर्गत राजकारण आणि महायुतीतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
“मित्रपक्षच शिवसेनेचे खच्चीकरण करत आहे,” असा थेट आरोप करत सत्तारांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका केली. सत्तार यांनी शिवसेनेत झालेल्या फूटीनंतरच्या परिस्थितीवर भाष्य करताना दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र याचवेळी त्यांनी भाजपकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा आरोपही केला.
या वक्तव्यांवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया देताना, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली, मात्र त्याचा निर्णय एकट्याने घेऊन उपयोग नाही, असे त्यांनी नमूद केले. (Sanjay Raut)
या दोन आमदारांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा शमल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर भूमिका स्पष्ट केली. सत्तार यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार करत शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.
“दोन शिवसेना असू शकत नाहीत,” असे सांगत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Weather update : अवकाळी पावसाचा कहर.! भिंत कोसळून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? (Sanjay Raut)
शिवसेना एकच आहे. दोन शिवसेना असूच शकत नाही. जिथे ठाकरे आहेत, तिच शिवसेना…हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शाह यांची शिवसेना असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच ज्यांचा स्वाभिमान झाला असेल, ज्यांना भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असंही संजय राऊत म्हणाले.
अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य (Sanjay Raut)
“शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले. मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत.”
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
“दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, बरेच वेळा वाटते. पण माझ्या एकट्याला वाटून काय फायदा”.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
“आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार आम्ही एकदा नाही तर दोनदा यशस्वीपणे स्थापन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता शिवसेना, ‘धनुष्यबाण’ चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद देईल”.
हेही वाचा : Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी चालवली ‘पिंक ई-रिक्षा’; महिला सक्षमीकरणाचा दिला संदेश





