Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Sanjay Raut : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत अरुण लखाणी यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखाणी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लखाणी हे सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे असल्याने या उमेदवारीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे. (Sanjay Raut)
“लखाणी संघाचे जुने कार्यकर्ते”
या उमेदवारीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “अरुण लखाणी हे जन्मापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जोडलेले आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ते काँग्रेसमधून किंवा इतर कोणत्याही पक्षातून भाजपमध्ये आलेले नाहीत.” ()
तसेच त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, “लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत सुप्रिया सुळे यांनाच प्रश्न विचारावेत.” (Sanjay Raut)
“मोदींनी विकास दाखवला तर मीही भाजपमध्ये जाईन”
भाजपच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला देशाच्या विकासासाठी नेमकं काय केलं हे पटवून दिलं, तर मीही भाजपमध्ये जाईन.” (Sanjay Raut)
ते पुढे म्हणाले, “देशाच्या विकासाबाबत बोलायचं झालं तर मी जवाहरलाल नेहरु यांनी काय केलं, इंदिरा गांधी यांनी काय केलं हे सांगू शकतो. महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या सरकारने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी काय योगदान दिलं हेही सांगू शकतो. पण मोदींनी नेमकं काय केलं, हे कोणी समजावून सांगितलं तर मी शांतपणे ऐकेन.” (Sanjay Raut)
भाजपवर टीकास्त्र
राऊत यांनी पुढे भाजपवर टीका करत म्हटलं की, “जर माझं मतपरिवर्तन झालं तर मी मोदींचं भजनही करेन. पण भाजपचे नेते विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. भाजपकडे स्वतःचं काहीच नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपमध्ये गेलेले नेते हे मूळचे इतर पक्षांतील आहेत.” (Sanjay Raut)
त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून या टीकेला काय उत्तर दिलं जातं, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sanjay Raut)





