जालना – राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, पाच वर्षे कामे केली तरी मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते. हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही, यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही. सिल्लोडची आगामी नगरपरिषदेची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल. कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्तार यांनी हे वक्तव्य केले.
सत्तार म्हणाले, “यावेळी आम्ही काठावर निवडून आलो. विधानसभेच्या निवडणुकीत मी उभा राहणार नाही. त्यामुळे कुणी काही माझे वाकडे करू शकत नाही. माझ्या मुलांला सांगितले की तुला लढायचे असेल तर लढ. मी लढणार नाही. मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद पाहिजे. जातीवादामध्ये माणूसकीही सोडून दिली जाते.”