Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबध्द; राधाकृष्ण विखे- पाटलांनी केले स्पष्ट
विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी, शैक्षणिक सवलती लागू करण्यासाठी आवश्यक ते सर्व शासन निर्णय तात्काळ काढण्यात यावेत, आवश्यकता असल्यास विभागाने प्रस्तावित शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश दिले.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला असून योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे दुर करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी, शैक्षणिक सवलती लागू करण्यासाठी आवश्यक ते सर्व शासन निर्णय तात्काळ काढण्यात यावेत, आवश्यकता असल्यास विभागाने प्रस्तावित शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश दिले.
मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठीची मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना केवळ पुणे येथे केंद्रित न ठेवता जिल्हास्तरावर राबवावी. त्यासाठी सारथीने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छूक संस्थांकडून अर्ज मागवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इयत्ता 5 वी ते 10 वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शालेय शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना, परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्काव्यतिरिक्त प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क इत्यादी 16 बाबींची प्रतिपूर्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यास पात्र असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. त्यामुळे पालकांवरील शिक्षणाच्या खर्चाचा मोठा भार हलका होणार आहे, असे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. सचिव धुळाज यांनी बैठकीत विविध योजनांबाबत सादरीकरण केले.






