Syed Mushtaq Ali Trophy 2024 (Bhanu Pania) : सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्याने सिक्कीमविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये एका विश्वविक्रम नोंदवला. 20 षटकांत बडोद्याच्या फलंदाजांनी स्कोअर बोर्डवर 5 विकेट गमावून 349 धावा लगावल्या, जी या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. संघाच्या वतीने भानू पानियाने सर्वाधिक कहर केला. उजव्या हाताच्या फलंदाजाने केवळ 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 134 धावांची तुफानी खेळी केली.
बडोद्याकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या भानू पानियाने 42 चेंडूत शतक झळकावले. भानू पानियानं 262 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 5 चौकार आणि 15 गगनचुंबी षटकारासह 134 धावा ठोकल्या. म्हणजे या खेळीदरम्यान बडोद्याच्या फलंदाजाने केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर 110 धावा केल्या.
🤯🤯🤯🤯🤯💀💀💀💀💀
WTF !!! Is it for real ?
349 Runs….and 15 sixes by bhanu Pania🤯 pic.twitter.com/YuXzRnYIlJ— Kunal Bishwal 🇮🇳 (@KunalBishwal07) December 5, 2024
आपल्या झंझावाती शतकाने खळबळ माजवणाऱ्या भानूचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. भानूने 2021 मध्ये बडोद्यासाठी लिस्ट-ए आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. टी-20 मधील त्याच्या बॅटचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी या फॉरमॅटमध्ये भानूची सर्वोच्च धावसंख्या 55 धावा होती.
ख्रिस गेलचा विश्वविक्रम थोडक्यात हुकला….
तसेच टी-20 क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडण्यापासून पानिया फक्त चार षटकार दूर राहिला. टी-20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळताना गेलने ढाका डायनामाईट्सविरुद्ध 18 षटकार ठोकले. पानियाने आणखी 4 षटकार मारले असते तर हा विक्रम मोडीत निघाला असता.