SMAT 2024 (Final) : सूर्यांश-सूर्याची दमदार कामगिरी, मुंबईने MP चा पराभव करत पटकावलं विजेतेपद…

SMAT 2024 Final (Mumbai vs Madhya Pradesh) : सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव करत इतिहास रचला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. यापूर्वी, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाने 2022/23 मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता. अंजिक्य रहाणे हा मालिकावीर तर सूर्यांश शेडगे हा सामनावीर ठरला.
𝘾𝙃𝘼𝙈𝙋𝙄𝙊𝙉𝙎!
The Syed Mushtaq Ali Trophy 2024-25 winners 👉 Mumbai 🙌
Scorecard – https://t.co/4J8WAjUsK9#SMAT | @IDFCFIRSTBank | @MumbaiCricAssoc pic.twitter.com/E8OrhUAwSf
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 15, 2024
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 174 धावा केल्या. मध्यप्रदेशची सुरूवात खराब झाली. सहा धावांच्या स्कोअरवर मध्य प्रदेशने दोन गडी गमावले होते. अर्पित गौर तीन धावा करून तर हर्ष गाविल दोन धावा करून बाद झाला. यानंतर सुभ्रंस सेनापतीही 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रजत पाटीदारने 81 धावांची नाबाद खेळी करत धावसंख्या 170 च्या पुढे नेली.
याव्यतिरिक्त संघासाठी हरप्रीत सिंगने 15, व्यंकटेश अय्यरने 17, राहुल बाथमने 19, त्रिपुरेश सिंगने 0, शिवम शुक्लाने एक आणि कुमार कार्तिकेयने एक धाव केली. मुंबईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन तर अथर्व अंकोलेकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात मुंबईने 17.5 षटकांत 5 गडी गमावताना 180 धावा करत सामना जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे आणि सूर्यांश शेडगे यांनी दमदार कामगिरी करत विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. मुंबईकडून सूर्यांशने स्फोटक खेळी खेळली. त्यानं 15 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 36 धावा केल्या तर अथर्वने 6 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 16 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. याआधी सूर्यकुमार यादवनं 35 चेंडूत 48 धावांची तर अंजिक्य रहाणे यानं 30 चेंडूत 37 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला.
पृथ्वी शाॅ विशेष काही करू शकला नाही. तो 10 धावा करून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर 16 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. शिवम दुबे अवघ्या 9 धावा करून बाद झाला. एमपीसाठी गोलंदाजीत त्रिपुरेश सिंगने दोन तर शिवम शुक्ला, व्यंकटेश अय्यर आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
IND vs AUS 3rd Test | जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा महान विक्रम काढला मोडित….
अजिंक्य रहाणेने केल्या सर्वाधिक धावा…
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024/25 मध्ये अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 58.62 च्या सरासरीने 469 धावा केल्या ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. चंदीगडचा गोलंदाज जगजीत सिंगने स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत 7 सामन्यात 18 बळी घेतले.





