Helicopter Crash : मोठी दुर्घटना..! हेलिकॉप्टर कोसळून 14 जणांचा मृत्यू, संपूर्ण देशात खळबळ
Helicopter Crash : हेलिकॉप्टर अचानक कोसळून झालेल्या या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Helicopter Crash : सौदी अरेबियातील रास तनुरा येथे रविवारी भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. (Helicopter Crash)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्वजण सौदी अरेबियाचे नागरिक होते. हे हेलिकॉप्टर सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. (Helicopter Crash)
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करत अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. (Helicopter Crash)
Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघातात ५ ठार
तेल वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर दुर्घटना
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून सौदी अरामकोने रास तनुरा टर्मिनलवरील कच्च्या तेलाची वाहतूक मर्यादित ठेवली होती. मात्र, शुक्रवारी येथून पुन्हा तेल वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत ही दुर्घटना घडल्याने या घटनेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. (Helicopter Crash)

रास तनुरा हे महत्त्वाचे तेल केंद्र
सौदी अरेबियाच्या आखाती किनारपट्टीवरील रास तनुरा हे जगातील महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रांपैकी एक मानले जाते. सरकारी कंपनी सौदी अरामकोच्या अनेक महत्त्वाच्या सुविधा येथे असून, ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. (Helicopter Crash)
मोठी बातमी…! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात; थेट समुद्रात क्रॅश





