Indian Cricketers Injuries : टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण! BCCI च्या रुग्णालयाला छावणीच स्वरूप; बुमराह-हार्दिकसह तब्बल १३ खेळाडू दुखापतग्रस्त
Indian Cricketers Injuries : सध्या बीसीसीआयच्या बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सीलन्स'मध्ये (CoE) तब्बल १३ भारतीय क्रिकेटपटू पुनरागमनासाठी उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत.

13 Indian Cricketers Injured BCCI Center Of Excellence Injury Status : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना सध्या दुखापतींचं Injuries) मोठं ग्रहण लागलं आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वीच जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे महत्त्वाचे खेळाडू दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. विशेषतः गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’मध्ये (CoE) तब्बल १३ भारतीय क्रिकेटपटू पुनरागमनासाठी (Rehab Process) उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत.
स्टार खेळाडूंच्या दुखापतींची सद्यस्थिती!
जसप्रीत बुमराह: ३० जुलै रोजी CoE मध्ये दाखल झालेल्या बुमराहच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात अतिरिक्त द्रव साचल्याचे निदान झाले होते. उपचारांनंतरही त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही वेळ विश्रांतीची गरज आहे.
हार्दिक पंड्या: डाव्या मांडीच्या दुखापतीतून सावरत असताना हार्दिकच्या उजव्या पोटरीत वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र, आता त्याच्या स्थितीत सुधारणा झाली असून १० ऑगस्टपासून त्याचा ‘रिटर्न टू बॉलिंग’ (Return to Bowling) सराव सुरू होणार आहे.
साई सुदर्शन: पायाच्या अंगठ्यात अजूनही वेदना होत असल्याने साई सुदर्शनला पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
🚨 REPORTS 🚨
13 Indian players who are part of the current setup and future plans are injured and undergoing rehabilitation at the Centre of Excellence (CoE) in Bengaluru! 🇮🇳🤕
(Source: Abhishek Tripathi)#India #Tests #ODIs #T20Is #Sportskeeda pic.twitter.com/vJ97E6EPhK
— Sportskeeda (@Sportskeeda) August 8, 2026
‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’मधील इतर १० खेळाडू आणि त्यांच्या दुखापती:
🚨 TEAM INDIA IS IN THE TROUBLE 🚨
– 13 main players in BCCI CoE for injury rehabilitation, who is the part of BCCI scheme 🤯
– Hardik, Bumrah, Nitish, Sai, Sundar, Harshit, Akash, Yudhveer Singh, Shuyash, Ashok, Himanshu, Prince, Varun & Riyan are injured.
– Biggest problem… pic.twitter.com/mD1pTuVP8g
— VIKAS (@Vikas662005) August 8, 2026
- नितीश कुमार रेड्डी: डाव्या मांडीच्या क्वाड्रिसेप्सला दुखापत
- हर्षित राणा: उजव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत
- वॉशिंग्टन सुंदर: उजव्या हॅमस्ट्रिंगची समस्या
- वरुण चक्रवर्ती: डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत
- आकाशदीप: पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर
- हिमांशु सिंह: उजव्या गुडघ्याला दुखापत
- अशोक शर्मा: कमरेच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर आणि डाव्या ११ व्या बरगडीत फ्रॅक्चर
- सुयश शर्मा: दोन्ही गुडघ्यांमध्ये पटेलर इन्सर्शनल टेंडिनोपॅथी
- युद्धवीर सिंह: उजव्या खांद्याला दुखापत
- रियान पराग: उजव्या खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन
खेळाडूंच्या या लांबच लांब यादीमुळे आगामी मालिकांपूर्वी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीची चिंता कमालीची वाढली आहे.





