Rishabh Pant Requests : ऋषभ पंत दिल्ली सोडणार! देवभूमीत घर बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे; पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?
Rishabh Pant Requests : मुख्यमंत्री धामी यांनीही तातडीने प्रतिसाद देत पंतला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami reply to Rishabh Pant land requests : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने आता दिल्ली सोडण्याचा आणि आपल्या मूळ राज्यात म्हणजेच उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) स्थायिक होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पोस्ट करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे मदत मागत जमिनीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री धामी यांनीही तातडीने प्रतिसाद देत पंतला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
“मला माझ्या पहाडी लोकांमध्ये परतायचे आहे…”
ऋषभ पंतने आपल्या भावुक पोस्टमध्ये लिहीले, ” नमस्कार पुष्कर सिंह धामी सर, तुम्ही कसे आहात? मी दीर्घकाळापासून उत्तराखंडचा स्थानिक नागरिक आहे. मला दिल्ली सोडून पुन्हा उत्तराखंडमध्ये शिफ्ट व्हायचे आहे. पण राहण्यासाठी मला चांगली आणि मोठी जमीन मिळत नाहीये. मला माझ्या मातृभूमीवर प्रचंड प्रेम आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी जमिनीसाठी प्रयत्न करतोय. उत्तराखंडला प्रमोट करण्यासाठी मला काही जमीन मिळणार होती, तीही अजून मिळालेली नाही. कृपया आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालावे.”
A gift would be lovey for representation out states at the highest level internationally stages but if you allow me I wanna buy it fromGovernment and on there rates at least I can have my first house built in my own state and our state please be helpful. Seriously didn’t know…
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 7, 2026
पंतने पुढे आणखी एक पोस्ट करत लिहीले की, “देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व केल्याबद्दल आपल्या राज्याकडून भेट (Gift) म्हणून जमीन मिळाली तर नक्कीच आवडेल, परंतु आपण इच्छित असल्यास मी सरकारकडून नियमानुसार जमीन खरेदी करण्यासही तयार आहे. किमान माझ्या स्वतःच्या राज्यात माझे घर तरी असेल.”
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा तातडीने प्रतिसाद –
प्रिय ऋषभ, आप उत्तराखण्ड के गौरव हैं। आपने अपने शानदार खेल और उपलब्धियों से देश-दुनिया में देवभूमि का नाम रोशन किया है। अपनी मातृभूमि के प्रति आपका यह प्रेम और यहां वापस आकर योगदान देने की भावना अत्यंत सराहनीय है।
आपके द्वारा उठाए गए विषय के संबंध में संबंधित अधिकारियों को… https://t.co/v3iFQVpxUK
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 8, 2026
ऋषभ पंतच्या या पोस्टची लगेच दखल घेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तर दिले, “प्रिय ऋषभ, तू देवभूमीचा गौरव आहेस. आपल्या उत्कृष्ट खेळाने तू जगभरात उत्तराखंडचे नाव उज्ज्वल केले आहेस. आपल्या मातृभूमीत परत येण्याची तुझी भावना अत्यंत कौतुकास्पद आहे. यासंदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत आणि ते लवकरच तुझ्याशी संपर्क साधून नियमानुसार सर्वतोपरी मदत करतील.”
सध्या ऋषभ पंत भारतीय संघासोबत कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर असून तेथे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे.





