अग्नीवीरसाठी सशस्त्र दलात 10 टक्के पदे राखीव ठेवण्यात येणार
Updated On:

नवी दिल्ली : अग्निवीर योजना जाहीर केल्यापासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधकांकडून सातत्याने या योजनेवर टीका केली जात आहे. याचे पडसाद लोकसभेत देखील बघायला मिळाले आहेत. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10 टक्के पदे राखीव ठेवली जातील असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आरपीएफ सारख्या सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यांना शारीरिक चाचणीतदेखील शिथीलता देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांना वयोमर्यादेतसुद्धा सूट मिळणार आहे.





