Director Atlee : दिग्दर्शक अॅटली दुसऱ्यांदा झाला बाबा; घरी चिमुकल्या परीचे आगमन
Director Atlee : पहिल्या लेकाच्या जन्मानंतर आता तीन वर्षांनी अॅटली-प्रियाने दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे.

Director Atlee : दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar ) आणि त्याची पत्नी प्रिया अॅटली यांनी नुकतीच चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अॅटली आणि त्याची पत्नी प्रिया यांना कन्यारत्न प्राप्त झालं असून ते दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
अॅटलीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अॅटलीने त्याचा पहिला मुलगा मीरचा कार्टूनवाला फोटो शेअर केला आहे आणि त्यावर “मला छोटी बहीण झाली” असं लिहिल्याची पोस्ट शेअर केली आहे. अॅटलीने शेअर केलेल्या या पोस्टवर दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड मनोरंजन सृष्टीतील कलाकरांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Director Atlee)
View this post on Instagram
दरम्यान, अॅटली-प्रिया यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी त्याचा जन्म झाला होता. पहिल्या लेकाच्या जन्मानंतर आता तीन वर्षांनी अॅटली-प्रियाने दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे.
अॅटलीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अॅटलीला ओळखलं जाते. त्यानंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून अॅटली कुमारने ‘जवान’ आणि ‘थेरी’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. अॅटलीने दिग्दर्शित केलेला ‘जवान’ हा चित्रपट शाहरुखच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यापैकी एक सिनेमा ठरला होता. Director Atlee
या सिनेमात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनताराची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दिग्दर्शनाबरोबरच अॅटली निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटातून तो निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. Director Atlee
हेही वाचा:
Iran US War : अमेरिकेची मोठी कारवाई; इराणचे ‘तुस्का’ मालवाहू जहाज ताब्यात; चर्चेपूर्वी वाढला तणाव





