Esha Gupta : अभिनेत्री ईशा गुप्ता सुरक्षित भारतात परतली; पोस्टद्वारे शेअर केला अनुभव
Esha Gupta : युएईमध्ये अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अखेर सुखरूप मायदेशी परतली आहे.

Esha Gupta : इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे, अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे जगभरातील उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. यामुळे जगभरातल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
या संघर्षाच्या काळामध्ये युएईमध्ये अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अखेर सुखरूप मायदेशी परतली आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सर्वांचे आभार मानले आहेत.
ईशा गुप्ताने पोस्ट करत लिहिले की, “मी भारतामध्ये सुरक्षित परतली आहे. 28 तारखेला मी विमानतळावर असताना हे सर्व सुरू झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळ बंद होते आणि सर्वत्र गोंधळ उडाला होता. कारण आमच्यापैकी कोणालाही काय घडतंय हे माहिती नव्हते. त्यानंतर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.
View this post on Instagram
पुढच्या मिनिटाला काय होईल आणि काय नाही, याची कोणालाच शाश्वती नव्हती. अनोळखी लोकं एकमेकांना धीर देत होते, प्रत्येकजण आपआपल्या कुटुंबियांना घरी फोन करत होते.”
ईशा गुप्ताने पुढे यूएई अधिकाऱ्यांचे विमानतळ कर्मचाऱ्यांचं कौतुक करताना म्हणाली की, “मी हे सांगू इच्छिते की, मी जे पाहिले ते यूएईसारख्या देशाची ताकद होती. आम्ही अबू धाबी विमानतळावर होतो. ग्राउंड स्टाफ आणि विमानतळ सुरक्षा ताबडतोब सक्रिय झाली आणि आम्ही सर्वजण या परिस्थितीत एकत्र असतानाही शांत राहिलो. Esha Gupta
मी विमानतळामध्ये आत गेलेही नाही, म्हणून मी पुन्हा अबू धाबीमधल्या माझ्या हॉटेलमध्ये परत गेले.” शिवाय तिने भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांना मदत केल्यामुळे भारत सरकारचेही आभार मानले. Esha Gupta
हेही वाचा:





