T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव करून इतिहास रचला आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा (२०२४ नंतर) आणि एकूण तिसऱ्यांदा (२००७, २०२४ आणि २०२६) T20 वर्ल्ड कप ( T20 World Cup) जिंकला आहे. हे पहिल्यांदाच आहे की एखाद्या संघाने सलग दोनदा हा खिताब जिंकला आहे, तसेच घरच्या मैदानावर विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. लाखो चाहते स्टेडियममध्ये आणि घराघरांतून ‘ब्लू’चा जल्लोष साजरा करत आहेत. भारताने २०२४ मध्येही वर्ल्ड कप जिंकला होता, आणि आता त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. T20 World Cup या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून, त्यात लखनऊ उत्तर मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ. नीरज बोरा यांची पोस्ट विशेष चर्चेत आहे. बोरा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले की, “जब मैदान में आदरणीय अमित शाहजी हो, तो बिना खाता खोले भी जीत सकते थे, फिर ये 255 तो आउट ऑफ रीच था ही।” जब मैदान में आदरणीय अमित शाह जी हो, तो बिना खाता खोले भी जीत सकते थे फिर ये 255 तो आउट ऑफ रीच था ही । @AmitShah #T20WorldCup #INDvNZ pic.twitter.com/pM1MMO4nQu — Dr Neeraj Bora (@DrNeerajBora) March 8, 2026 ही पोस्ट व्हायरल झाली असून, हजारो लाइक्स, रीपोस्ट्स आणि कमेंट्स आले आहेत. अनेकांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्याला राजकीय ट्विस्ट जोडला. एका युजरने लिहिले, “तुम्ही बरोबर बोलता, अमित शाहजींनी आक्रमक फलंदाजी केली!” तर दुसऱ्यांनी “क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका” असे म्हणत फिरकी घेतली. बोरा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्या बद्दल बोलायचे झाले तर फायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. हा T20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८९ धावा केल्या, तर इशान किशन (५४) आणि अभिषेक शर्मा (५२) यांनीही अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडला प्रत्युत्तर देताना १९ षटकांत सर्वबाद १५९ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराहने ४/१५ अशी शानदार गोलंदाजी केली, तर अक्षर पटेलने ३/२७ घेतले. बुमराहला ‘प्लेयर ऑफ द मैच’ तर सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला.