Maharashtra Politics : महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत कलहाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक मोठी पोस्ट करत राज्याच्या राजकारणाबाबत धक्कादायक दावा केला आहे. सत्तेतील सर्वात मोठा पक्ष (भाजप) आपल्याच मित्रपक्षांची (Maharashtra Politics) शिकार करणार असून, ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा त्यांचा आरोप आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये (Maharashtra Politics) म्हटले आहे की, “भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार-खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.” भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला… — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2026 भोंदू खरात प्रकरणाबाबत गंभीर आरोप रोहित पवार यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘भोंदू खरात प्रकरणा’चा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे.” त्यांनी पुढे लिहिले, “आज भाजप मित्रपक्षांप्रती ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत ‘जा बेवफा जा हमे…’ याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.” Maharashtra Politics राजकीय वर्तुळात खळबळ रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, यामागे ‘ऑपरेशन टायगर’सारखी रणनीती असल्याचा संकेत रोहित पवारांनी दिला आहे. सध्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाला जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र करणारा ठरला आहे. दरम्यान, भाजपकडून अद्याप या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, महायुतीतील मित्रपक्षांकडून या मुद्द्यावर लवकरच चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांच्या या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘मित्रपक्षांतील अविश्वास’ हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे. पुढील काही दिवसांत या दाव्यामुळे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.