Punjab Assembly Election : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपची ३१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
या नव्या यादीसह पक्षाने आतापर्यंत ११७ सदस्यीय विधानसभेसाठी एकूण ७१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

Punjab Assembly Election – आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने गुरुवारी आपल्या ३१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीसह पक्षाने आतापर्यंत ११७ सदस्यीय विधानसभेसाठी एकूण ७१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाने ४० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आणि जनतेच्या अभिप्रायाचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
या यादीत पक्षाशी दीर्घकाळापासून जोडलेल्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आले असून, काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली असल्याचे भगवंत मान यांनी नमूद केले.
ते म्हणाले, उमेदवारांची नावे लवकर जाहीर केल्यामुळे त्यांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्षाची धोरणे व कार्यक्रम लोकांसमोर मांडण्यासाठी अधिक वेळ मिळेल. उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्णपणे कामगिरी आणि जनसंपर्कावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी स्पष्ट केले.






