Swapna Sundari Movie : ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटगृहातून बेपत्ता; भूषण प्रधानने व्यक्त केली खंत
Bhushan Pradhan:

Bhushan Pradhan: दिग्दर्शक अक्षय शिंदे यांचा ‘स्वप्नसुंदरी’ हा मराठी चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय यात अशोक शिंदे, शिल्पा नवलकर, माधवी जुवेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मात्र काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला हा मराठी सिनेमा थिएटरमधून गायब झाला आहे. अनेकदा मराठी सिनेमाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याची नाराजी अनेक कलाकरांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ‘स्वप्नसुंदरी’ या सिनेमाला देखील थिएटरमध्ये शो मिळत नसल्याची खंत भूषण प्रधानने व्यक्त केली आहे.
भूषणने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर “Missing स्वप्नसुंदरी चित्रपटगृहातून बेपत्ता आहे”, असं लिहिलं आहे. या पोस्टमध्ये फक्त भूषण प्रधान दिसत असून सिनेमाची हिरोईन सायली पाटील गायब असल्याचं दिसत आहे. (Bhushan Pradhan)
View this post on Instagram
“स्वप्नसुंदरी मोजक्यात चित्रपटगृहांमध्ये दिसत आहे. २४ जुलैपासून ती आपल्या भेटीला येणार होती. पण, अजूनही अनेक सिनेमांगृहांमधून ती गायब आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याने’ तुमच्या परिसरातील कोणत्या परिसरातील चित्रपटगृहात सिनेमा नाही, ते सांगा’ असे विचारले आहे. भूषणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अनेक थिएटरमध्ये ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचे शो नसल्याची तक्रार केली आहे. (Bhushan Pradhan)
दरम्यान, ‘स्वप्नसुंदरी’ हा एका प्रेमकथेला लग्नसंस्था, कौटुंबिक नाती आणि योग्य जोडीदाराच्या शोधाशी जोडणारा मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे.
हेही वाचा:





