Bhushan Pradhan: मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानने गुपचुप उरकला साखरपुडा; शेअर केला खास फोटो
Bhushan Pradhan: भूषण प्रधानच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

Bhushan Pradhan: सुप्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकतेच त्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्याने गुपचूप साखपुडा उरकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भूषण प्रधानची पोस्ट
भूषण प्रधानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं एका मुलीला मिठी मारलेली दिसतेय. त्याचबरोबर दोघांच्याही रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसतेय. भूषण प्रधानने गुपचूप साखरपुडा उरकला असून अभिनेत्यानं ही पोस्ट शेअर करत, ‘२४.७.२०२६ सेव्ह द डेट. आमच्या आयुष्याच्या नवीन सुरुवातीचे साक्षीदार व्हा’ असं लिहिलं आहे. Bhushan Pradhan
View this post on Instagram
यात भूषणने मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. भूषण प्रधानच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, यापूर्वी भूषणचं नाव जुनं फर्निचर फेम अभिनेत्री अनुशा दांडेकरसोबत जोडलं जात होतं. या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलेलं. सिनेमानंतर ते अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यामुळे आता या फोटोमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दिसत नसल्यामुळे भूषणची होणारी पत्नी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. Bhushan Pradhan
दरम्यान, भूषण प्रधानच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘घरत गणपती’, ‘जुनं फर्निचर’, ‘तू तिथे असावे’, ‘आम्ही दोघी’, ‘सतरंगी रे’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस मॅच’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. Bhushan Pradhan
Bhushan Pradhan
हेही वाचा:





